Vasubaras Wishes in Marathi | वसुबारसच्या शुभेच्छा

Vasubaras Wishes In Marathi 2025 – ‘दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी’, हिंदू धर्मामध्ये गाईला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. भारतात विविध पद्धतींनी दिवाळीची सुरुवात होते. मात्र महाराष्ट्रात दिवाळीची सुरुवात वसुबारस (गोवत्स द्वादशीला) पूजेने होते. यादिवशी गाय वासराची पूजा केली जाते. दिवाळीचा पहिला दिवा वसुबारसेला लागतो व अभ्यंग स्नान देखील या दिवशी करून दिवाळीची उत्साहात सुरुवात केली जाते.
तर चला तर मग, वसुबारसनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास वसुबारसच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Vasubaras Quotes In Marathi 2025 –

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कोणाच्या, प्रिय बळीराजाच्या
वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा…!

गोमातेचे पूजन करतात, वसुबारसेच्या दिवशी
दिवाळी साजरी करतात, आनंदाने मिळुनी एकमेकांशी
वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा…!

सुख समृद्धी भरभराट, घरी येईल तुमच्या
पूजुनी गोमातेला, आशीर्वाद घ्या गाय वासराचा
वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा…!

गाई वासराला पुजूया, संस्कृती आपली जपूया
वसुबारसेला सर्वांनी, मिळून दिवाळी साजरी करूया
वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा…!

गाई वासराला नैवेद्य पुरणपोळीचा, सजल्या गाई दिनी वसुबारसेच्या
पुजले गोमातेला औक्षण करुनी दिवाळीला
वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा…!

गोमातेला सांगू आपली गाऱ्हाणी, दूधदुभत्याची सदा व्हावी वृद्धी,
व्हावी कृपा, नांदावी रिद्धी-सिद्धी, गोवत्स पूजनाने लाभावी समृद्धी..!
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारसनिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा…!

close