पांडुरंग.. Panduranga Lyrics from Devmanus Marathi Movie. Halad song Sung by Sonu Nigam and composed by Rohan Rohan. Lyrics penned by Prashant Madpuwar.
पांडुरंग.. Panduranga Song Lyrics –
Movie – Devmanus
Music – Rohan Rohan
Lyrics – Prashant Madpuwar
Vocals – Sonu Nigam
Ovi Featuring – Mahesh Manjrekar, Renuka Shahane, Subodh Bhave
Music on – Luv Films
Enjoy The Superhit Song ‘Panduranga‘ Video Song and Lyrics
Panduranga Song Lyrics –
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम..
पंढरीनाथ महाराज की जय…!
पांडुरंगा पांडुरंगा
साथ राहे तुझी अंतरी
पांडुरंगा पांडुरंगा
आज वारी निघे पंढरी…
दर्शनाची तुझ्या मायबापा मनी आस ही लागली
श्वास नामात रे गुंगला देह शोधे तुला माऊली… (२)
साद ही ऐक मनाची पांडुरंगा तू आता
आस तू आहे सुखाची पंढरीच्या रे नाथा
हे दावं तू वाट आता जरा ज्योत होऊनी रे विठ्ठला..
पांडुरंगा पांडुरंगा
साथ राहे तुझी अंतरी
पांडुरंगा पांडुरंगा..
आज वारी निघे पंढरी… (२)
पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा हरी (२)
विटेवरी उभे सावळे सुरेख रूप
पाहून जीवाची काहिली सरे हे
राऊळात तुझ्या विठू माऊली बघ
सुखाचं आभाळ ओंजळी पडे हे
चरणाशी तुझ्या ठेऊन माथा
लढण्याचं मिळे बळ विधाता
सरलेल्या वाटेलाही तुझीच दिशा दिसे
तूच बंधू तू सखा तू त्राता
बाप आहे तू साऱ्या जगाचा
तरी शरणी तुझिया नाथा आईची माया मिळे…
हे दाव तू वाट आता जरा ज्योत होऊनी रे विठ्ठला..
पांडुरंगा पांडुरंगा
साथ राहे तुझी अंतरी
पांडुरंगा पांडुरंगा
आज वारी निघे पंढरी… (२)
पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा हरी.. (२)
हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा
तुझ्या नामात रुजावा जीव माऊली
यातनेच्या वादळात तुझी लाभते रे साथ
रखरखत्या उन्हात तुझी सावली
तूच आधार जनाचा तूच आकार सुखाचा
तूच आहे नाथा जीवनाचा पाया
तूच उध्दारी जीवाला भाबड्या या लेकराला
पाठीराखा तूच आहे विठुराया..
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय…!