Buddha Purnima Wishes in Marathi | बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

Buddha Purnima Wishes In Marathi 2025 – “बुद्धम् शरणम् गच्छामि, धम्मम् शरणम् गच्छामि, संघम् शरणम् गच्छामि”, बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाल्याने हा दिवस बुद्ध जयंती म्हणून साजरा करण्यात येतो. भगवान गौतम बुद्धांनी करुणा, अहिंसा आणि आध्यात्मिक शांतीची शिकवण सर्वांना दिली होती. बौद्धधर्मातील लोक यादिवशी धर्मस्थळी जाऊन गौतम बुद्धांना प्रार्थना करतात.
तर चला तर मग, बुद्ध पौर्णिमेनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Buddha Purnima Wishes in Marathi 2025 –

“बुद्धम् शरणम् गच्छामि, धम्मम् शरणम् गच्छामि, संघम् शरणम् गच्छामि” बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!

सत्याची साथ सदैव देत राहा चांगले बोला, चांगले वागा प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

बुद्ध करुणा आहे, शिक्षा नाही..
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही..
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही..
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही..
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही..
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

जगात पसरलेला अंध:कार, नाहीसा करण्यासाठी सोडले ज्यांनी घरदार, बुद्ध पौर्णिमा साजरी करुन, सर्वांनी हात जोडूनि मानूया त्यांचे आभार, बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!

प्रत्येकजण भगवान बुद्धांच्या ध्यानात तल्लीन असतो आणि
त्यांच्या हृदयात शांती नांदत असते,
म्हणूनच ही बुद्ध पौर्णिमा सर्वांसाठी खास आहे,
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा…!

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे,
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे,
विश्व वंदनीय गौतम बुद्ध,
यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा… !

close