Guru Purnima Wishes in Marathi | गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा

Guru Purnima Wishes In Marathi 2025 – ‘गुरुने दिला ज्ञानरुपी वसा.. आम्ही चालवू हा पुढे वारसा..’ आषाढ महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला व्यासपौर्णिमा व गुरुपौर्णिमा असेही म्हटले जाते. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. महर्षी व्यासमुनींना वंदन करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा हा पवित्र दिन होय. याच दिवशी व्यासमुनींचा जन्म झाला त्यामुळे यादिवशी गुरु पौर्णिमा साजरी करतात असे म्हणतात. प्रामुख्याने आपल्या गुरुप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस उत्सव साजरा केला जातो. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंनी दिलेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
तर चला तर मग, गुरु पौर्णिमेनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Guru Purnima Quotes In Marathi 2025 –

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर..
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

आपले आईबाबा,शिक्षक,मित्र, आयुष्यात वाट दाखवणारे सर्व
अशा प्रत्येक व्यक्तीला जो काही ना काही शिकवतो,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा, गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती, गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रामाणिकतेचे मूर्तिमंत प्रतिक
आपणा सर्वांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा…!

गुरुविना मति नाही, गुरु विना गती नाही,
गुरुविना आपले अस्तित्व नाही
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

आधी गुरुसी वंदावे, मग साधन साधावे,
गुरु म्हणजे माय बापं नाम घेता हरतील पापं,
गुरुपौर्णिेमेच्या शुभेच्छा…!

आई माझी गुरु, आई माझी कल्पतरु,
माझ्या प्रिय आईला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा…!

close