Diwali Wishes in Marathi | दिवाळीच्या शुभेच्छा

Diwali Wishes In Marathi 2025 – ‘दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी’, दिवाळी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. दिवाळी हा प्रकाश, आनंद आणि स्नेहाचा सण म्हणून संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणात घराघरांत दिव्यांची रोषणाई, फटाक्यांचा आवाज आणि आनंदाचा वर्षाव पाहायला मिळतो. हा सण आपल्याला अंध:कारावर प्रकाशाचा, दु:खावर आनंदाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय शिकवतो. या शुभ प्रसंगी लोक एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात.
तर चला तर मग, दिवाळीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Diwali Quotes In Marathi 2025 –

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी,राजलक्ष्मी,
या दिपावलीत, या अष्टलक्ष्मी
तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली…!

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट..!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!

स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!

दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा, लक्ष्मीचा सण आहे
आणि ही दिवाळी तुमचे जीवन आनंदाने भरून जावो,
जग प्रकाशाने उजळून निघो, घरात लक्ष्मीचे आगमन होवो,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!

सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!

दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं, प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं, या दिवाळीत
तुमच्याही आयुष्यात येवो खूप खूप आनंद, रोषणाईने उजळलेल्या
घरात होवो माता लक्ष्मीचं आगमन..
Happy Diwali…!

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची
चाहूल दिवाळी पहाट..
आपणास दिपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!

close