Ashadhi Ekadashi Wishes In Marathi 2025 – “बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल..”, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी, पद्मनाभा एकादशी आणि मोठी एकादशी या नावाने ओळखले जाते. देवशयनी एकादशी बद्दल असे म्हटले जाते की, या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात. आषाढी एकादशी म्हणजे डोळ्यासमोर येतो वारकऱ्यांचा प्रचंड जनसागर, टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांसह पायी चालणारी दिंडी, चंद्रभागेच्या काठावर दुमदुमणारा टाळ नाद, भोळ्या भाबड्या भक्तांची माऊलींच्या दर्शनासाठी असलेली आस आणि विठ्ठल माऊलीचे भक्ताला प्रेमपान्हा पाजणारे मनोहर रूप. आषाढी एकादशीची माहिती सर्वांना असतेच. आषाढी एकादशीनिमित्त सर्व भक्तगणांना द्या…
तर चला तर मग, आषाढी एकादशीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Ashadhi Ekadashi Quotes In Marathi 2025 –
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा…
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा…!
हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा…
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥
तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा…
आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहतां लोचन सुखावले…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा…!
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…!
सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा,
मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा…!