Akshaya Tritiya Wishes in Marathi | अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा

Akshaya Tritiya Wishes In Marathi 2025 – हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेच्या तिथीला तथा सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा हा सण ‘अखाती तीज’, ‘आखाजी’, म्हणून देखील ओळखला जातो. या दिवशी सोनं खरेदीला विशेष महत्त्व असते. या दिवशी जे शुभ कार्य केलं जातं त्याचं फळ हे अक्षय मिळतं. अक्षय म्हणजेच ज्याचा कधीही क्षय होणार नाही ते फळ. याच कारणामुळे हा दिवस हिंदू धर्मात शुभ मानला जातो.
तर चला तर मग, अक्षय्य तृतीयेनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Akshaya Tritiya Wishes in Marathi 2025 –

“जीवनदीप जाई उजळुनी, सुख, समृद्धी लाभो जीवनी,
भक्ती-प्रेमरस ओथंबुनी, बंधुभाव वाढे जनगणमनी,
आखाजी व अक्षय्य तृतीयेच्या अक्षय्य शुभेच्छा…”

आशा आहे या मंगलदिनी, आपल्या जीवनात नवचैतन्य येवो
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद, सुख, समाधान घेऊन येवो..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सोन्याच्या झळाळीप्रमाणे, उजळून जावो आयुष्य तुमचे
सुख,समृद्धी नांदो तुमच्या दारी, हेच मागणे ईश्वराकडे आमचे..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!

अक्षय्य सुखाचा दिलासा, मनात कर्तृत्वाचा भरवसा
लक्ष्मीसवे मिळो सरस्वतीचा वारसा, शुभेच्छांना मुहूर्त हवाहवासा..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आनंदाचे तोरण लागो दारी सुंदर रांगोळी अवतरे अंगणी सुखासमाधानाचा असो आजचा दिवस हीच सदिच्छा..
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!

close