Diwali Padwa Wishes In Marathi 2025 – ‘दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी’, दिवाळी पाडवा हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. दिवाळी पाडवा हा प्रकाश, आनंद आणि स्नेहाचा सण म्हणून संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणात घराघरांत दिव्यांची रोषणाई, फटाक्यांचा आवाज आणि आनंदाचा वर्षाव पाहायला मिळतो. महाराष्ट्रात हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. पाडवा हा सण अतिशय महत्त्वाचा असतो. हा दिवस पती-पत्नीच्या नात्यातील अतिशय खास दिवस आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या या दिवशी अभ्यंगस्नानाची रीत आहे. पती-पत्नीच्या नात्याला देखील साजरा करणारा हा सण आहे. पत्नी पतीचं या सणाच्या निमित्ताने औक्षण करते आणि पती तिला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देतो.
तर चला तर मग, दिवाळी पाडव्यानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Diwali Padwa Quotes In Marathi 2025 –
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा,
दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा…!
साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे, उत्तम दिनाचे महात्म्य आहे,
सुखद ठरो हा छान पाडवा,
त्यात असूदे अवीट गोडवा…!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा…!
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन आली आज दिवाळी
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वहिवाट
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा…!
धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
किर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन
संबंधाचा फराळ आणि समृद्धीचा पाडव्याच्या शुभेच्छा…!
नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळीची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे..
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!
आनंदादायी वाटणारे आकाशकंदिल,
सुफळ जीवनासाठी सजावट,
वाईटाचा नाश करण्यासाठी फटाके,
यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाई आणि
देवाचे आभार मानण्यासाठी दिवाळीचे दिवे.
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा…!
सगळा आनंद, सगळे सौख्य सगळ्या स्वप्नांची पूर्तता,
सगळे ऐश्वर्य आपणास लाभू दे..
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा…!