Shree Ram Navami Wishes in Marathi | श्रीराम नवमीच्या शुभेच्छा

Shree Ram Navami Wishes In Marathi 2025 – “जय श्रीराम”, चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचागानुसार अत्यंत महत्वाचा दिवस. या तिथीला भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता. भारतात हा दिवस आपण मोठ्या आनंदाने व उत्साहाने रामनवमी म्हणून साजरा करतो. तर चला तर मग, श्रीराम नवमीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास श्रीराम नवमीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Shree Ram Navami Wishes in Marathi 2025 –

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम रघुवंशनाथम,
कारुण्यरुपं करुणाकरं तं शरणं प्रपद्ये,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा…!

रामाप्रती भक्ती तुझी । राम राखे अंतरी ।
रामासाठी भक्ती तुझी । राम बोले वैखरी ।
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा…!

राम अनंत आहे,राम शक्तिमान आहे, राम सर्वस्व आहे..
राम सुरुवात आहे आणि राम शेवट आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा…

“दशरथ नंदन राम दया सागर राम
सत्यधर्म पारायण राम
राम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा..!”

श्री राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी, मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे..
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा…!

मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या
जीवनातून आपल्याला विचार,
शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठता
आणण्यासाठी प्रेरणा मिळो.
श्रीराम नवमीच्या मनापासून शुभेच्छा…!

close