Republic Day Wishes in Marathi | प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Republic Day Wishes In Marathi 2026 – भारत माता की जय..!, भारतात २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि उत्सवाचा दिवस. १९५० साली आजच्याच दिवशी आपल्या देशाची राज्यघटना अमलात आली आणि भारत एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनले. दरवर्षी प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
तर चला तर मग, प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Republic Day Quotes In Marathi 2026 –

उत्सव तीन रंगांचा, अभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या चरणी, ज्यांनी भारत देश घडवला..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा…!

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो..!
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा…

प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी,
भारतीय संविधानाचा सन्मान करूया..
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा…!

या भारतमातेला कोटी कोटी वंदन करूया,
भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र,
बनविण्यासाठी कटिबध्द होऊया..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

मुक्त आमचे आकाश सारे झुलती..
हिरवी राने वने स्वैर उडती पक्षी नभी..
आनंद आज उरी नांदे..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

close