Rajmata Jijau Jayanti Wishes In Marathi 2026 – राजमाता जिजाबाई शहाजी भोसले ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांना राजमाता, राष्ट्रमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते. हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि हिंदू धर्माचे रक्षण करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व प्रतापवीर संभाजी राज दोन छत्रपतींना घडविणाऱ्या आदर्श राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जाधव घराण्यात झाला.
तर चला तर मग, राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास राजमाता जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi 2026 –
राजमाता जिजाबाई यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन…
“मराठा मातीत ज्याने केला गनिमी कावा,
तो एकच होता राजमाता जिजाऊंचा छावा,
सांभाळले तिने सर्वांना मायेने आणि प्रेमाने,
स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने,
जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!”
“जननी मराठा साम्राज्याची, सारूनी बाजूस राजघराणी,
जनतेच्या साऱ्या न्यायाखातर, लढा लढविली ही रणरागिणी,
जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!”
तुम्ही नसता तर नसते झाले
शिवराय अन शंभू छावा
तुमच्या शिवाय नसता मिळाला
आम्हांला स्वराज्याचा ठेवा जय जिजाऊ..
जिजाऊ जयंती निमित्त मानाचा मुजरा..!
जिजाऊ..
ज्यांच्या प्रेरणेने उजळली स्वराज्यज्योती
याच माऊली ज्यांनी घडवले..
श्री शिवछत्रपती राजमाता जिजाबाईं
यांच्या जयंती निमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
जिजाऊ ची गौरव गाथा
तिच्या चरणी माझा माथा..
स्वराज्यप्रेरिक राजमाता
राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ..
यांच्या जयंती निमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली
पहार काढून ज्या माऊलीने
गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला
त्या थोर ‘राजमाता जिजाऊला’
मानाचा मुजरा..!
राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ
यांच्या जयंती निमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
आपलं आयुष्य जीने स्वराज्याची स्वप्न पाहण्यात
आणि साकारण्यात खर्च केलं..
जिने ह्या रयतेला एक न्हवे दोन
छत्रपती दिलें अशा राष्ट्रमाता,
राजमाता जिजाऊंच्या
जयंती निमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
स्वराज्याचा जिने घडविला विधाता..
धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता..
जय भवानी ! जय शिवाजी ! जय जिजाऊ
राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन…