Netaji Subhas Chandra Bose Jayanti Wishes in Marathi | नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीच्या शुभेच्छा

Netaji Subhas Chandra Bose Jayanti Wishes In Marathi 2026 – “जय हिंद!”, २३ जानेवारी हा नेताजींचा जन्मदिवस आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावणारे महत्त्वाचे नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली जात आहे. नेताजींनी दिलेला “जय हिंद!”, “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा”, या घोषणेने भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यावर अमिट छाप सोडली आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नेताजींची भूमिका महत्त्वाची आहे. नेताजींच्या कल्पनेप्रमाणे एक मजबूत आणि समृद्ध भारत घडवण्याच्या आपल्या वचनबद्धतेत एकजूट होऊ या आणि देशभक्तीची ज्योत आपल्या हृदयात तेवत ठेवूया.
तर चला तर मग, नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Netaji Subhas Chandra Bose Jayanti Quotes In Marathi 2026 –

“जय हिंद..! नेताजी सुभाषचंद्र बोस
यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन…

“तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा..!
या घोषणेने स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा देणाऱ्या
नेताजींना जयंतीनिमित्त शत शत नमन…”

“स्वातंत्र्याच्या या युद्धामध्ये आपल्यात कोण टिकेल
हे मला ठाऊक नाही..! पण मला हे माहित आहे,
शेवटी विजय आपलाच असेल..!”
नेताजी सुभाषचंद्र बोस
यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन…

“आजचा दिवस आपल्याला नेताजींच्या देशभक्तीची,
निर्भयता आणि समर्पणाची आठवण करून देतो.
नेताजींना वंदन. शौर्य दिनाच्या शुभमुहूर्तावर नेताजींना विनम्र अभिवादन…”

“भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील पराक्रमी योद्ध्याला,
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. जय हिंद…!”

close