Narali Purnima Wishes In Marathi 2025 – श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथी ही नारळी पौर्णिमा असून कोळी बांधवांसाठी हा सर्वात महत्त्वाचा सण असतो. या दिवशी कोळी बांधव दर्याला नारळ अर्पण करून आपली कृतज्ञता व्यक्त करतात. हा सण सर्वांसाठी तितकाच खास असतो कारण नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन देखील साजरे केले जाते. समुद्र ज्यांच्या उपजीविकेचे साधन आणि देवता असते, असे लोक समुद्राला नारळ अर्पण करुन पूजा करतात. त्यामुळे हा सण नारळी पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. समुद्राला नारळ अर्पण करून नव्याने मासेमारी हंगामाची सुरुवात केली जाते. समुद्रातील प्रवास सुरक्षित व्हावा, भरपूर मासे मिळावे आणि जीवन समृद्ध व्हावे, अशी प्रार्थनाही कोळी बांधव करतात.
तर चला तर मग, नारळी पौर्णिमेनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Narali Purnima Quotes In Marathi 2025 –
वरुण देवतेची उपासना करून आपण त्याच्या कृपेस पात्र होऊया,
तुमच्या जीवनात सौख्य, समाधान आणि भरभराटीचे वारे वाहो
नारळी पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा…!
नारळी पौर्णिमेला समुद्राला आले उधाण, कोळी बांधव दर्याला करती नारळ अर्पण,
कृतज्ञता दर्याप्रती दाखवून कोळीबांधव, आपल्या प्रेमाचे करतात समर्पण !
नारळी पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा…
सागर कोळीबांधवांचा राजा, त्याच्या जीवावर करतात मजा,
नारळी पौर्णिमेला नारळ सोन्याचा, सर्व मिळून मान देतात दर्याचा
नारळी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!
सण आयलाय गो, आयलाय गो, नारळी पुनवचा..
मनी आनंद मावना, कोळ्यांच्या दुनियेचा
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!
श्रावणातील सणवारांच्या बहरात येणाऱ्या, नारळी पौर्णिमेचा दिवस असतो खास
सर्व कोळीबांधवांना व त्यांच्या कुटुंबाला, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा…!
कोकण म्हणजे निळी खाडी, कोकण म्हणजे माडाची झाडी..!
कोकण म्हणजे सागराची गाज, कोकण म्हणजे रुपेरी वाळुचा साज..! नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…