Merry Christmas Wishes in Marathi | नाताळच्या शुभेच्छा

Merry Christmas Wishes In Marathi 2025 – “मेरी क्रिसमस”, प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजेच ख्रिसमस अर्थात नाताळ हा सण ख्रिश्चन बांधवांचा महत्त्वाचा सण आहे. देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ख्रिसमस सण दरवर्षी २५ डिसेंबरला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिसमस या सणामुळेच सरत्या वर्षाचा शेवट हा गोड होत असतो. नाताळ सण म्हणजे प्रेम, शांतता आणि आनंदाचा उत्सव. घराघरात झगमगणारे दिवे, सजलेले ख्रिसमस ट्री आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण यामुळे वातावरण आनंदमय होतं आणि एकमेकांना “Merry Christmas” म्हणून शुभेच्छा देतात.
तर चला तर मग, नाताळनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास नाताळच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Merry Christmas Quotes In Marathi 2025 –

सांता घेऊन येईल भरभरून आशीर्वाद,
तुमचं आयुष्य होईल सुंदर आणि गोड.
प्रत्येक नात्यात फुलवा प्रेमाचा रंग,
नाताळची रात्र ठरू दे अमर स्मरण..!
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा…!

आनंद वर्षाव करीत संता येईल
सर्वांचा उत्साहाने हा
नाताळ साजरा होईल
ख्रिसमस नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा…!

आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी असू दे
नाताळच्या शुभेच्छा…!

“प्रभू आपल्या सर्व संकल्पना पुर्ण करो.
ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा..!

सगळा आनंद, सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता,
यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य
हे आपल्याला मिळू दे याच
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..!”

हिमाचं वस्त्र झाकतं झाडाला,
आनंदाचं गाणं गातं मनाला.
प्रेम आणि शांततेचा हा सण,
जपून ठेवूया हे अनमोल क्षण.
नाताळचा प्रकाश आयुष्य भरू दे,
आनंदाच्या सरी मनात रुजू दे.
नाताळच्या शुभेच्छा…!

close