Maharashtra Din Wishes in Marathi | महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

Maharashtra Din Wishes In Marathi 2026 – “जय जय महाराष्ट्र माझा..”, 1 मे रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदान साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. 1960 साली महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून स्थापन झाल्याचा हा दिवस आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पराकोटीच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या चळवळीत लोकनेते स्वातंत्र्यसैनिक आणि विचारवंतांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ​महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात ठिकठिकाणी कार्यक्रम घेतले जातात. शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांमध्ये झेंडावंदन केलं जातं. काही ठिकाणी मिरवणुका, ढोल-ताशा, पारंपरिक पोशाख अशा कार्यक्रमांची रंगत असते.
तर चला तर मग, महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Maharashtra Din Quotes In Marathi 2026 –

मंगल देशा..
पवित्र देशा..
महाराष्ट्र देशा…
प्रणाम घ्यावा माझा
हा महाराष्ट्र देशा..
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी..
मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक
नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा…

जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा.. जय जय महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

महाराष्ट्रदिन चिरायु होवो
महाराष्ट्रदिनाच्या सर्व महाराष्ट्र वासीयांना
मनापासुन महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी..
गुणगुणलो जे गीत गीत मराठी..
मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

close