Krishna Janmashtami Wishes In Marathi 2025 – “कृष्ण जन्मला गं बाई..!”, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे म्हटले जाते. भगवान विष्णूचा आठवा अवतार श्री कृष्ण यांचा जन्मदिवस जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवासाठी जन्माष्टमीची रात्र विशेष मानली जाते. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता, म्हणून या दिवशी सर्वजण रात्रभर जागून त्यांचा जन्म साजरा करतात. श्रीकृष्णाची विविध रुपे आहेत. या दिवशी, अनेकजण घरात आणि मंदिरात, लोक श्रीकृष्णाची मूर्ती झोपाळ्यात ठेवतात आणि नवीन कपडे, दागिने आणि फुलांनी सजवतात. पहिल्या दिवशी जन्माष्टमी आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते. जन्माष्टमीच्या दिवशी, लोक उपवास करून भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा करतात.
तर चला तर मग, श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Krishna Janmashtami Quotes In Marathi 2025 –
“अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, राम नारायणं जानकी वल्लभं,
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!”
हाथी घोडा पालखी.. जय कन्हैया लालकी,
कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा…
श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी.. हे नाथ नारायण वासुदेवा
कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा…
कृष्ण ज्याचं नाव, गोकुळ त्याचं धाम,
अशा श्री भगवान कृष्णाला.. कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा…
“कृष्ण मुरारी नटखट भारी, माखनचोर जन्मला,
रोहिनी नक्षत्राला, देवकी नंदाघरी
बाळ तान्हे तेजस्वी, मोहूनी घेती
सर्व मिळूनी पाळणा गाती, जन्माष्टमीच्या शुभेच्छा…!”
“मुरली मनोहर, ब्रिजचे कर्ताधर्ता, ते आहेत नंदलालचे गोपाला
बासरीच्या मोहक आवाजाने सर्व दुःख हरणारा, मुरली मनोहरचा सण गोविंदा गोपाळा
जन्माष्टमीच्या शुभेच्छा…!”
“गोकुळात होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रसला रास,
यशोदा,देवकी होत्या ज्याच्या माता, तोच साऱ्या जगाचा लाडका कृष्ण कन्हैया,
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…!”