Hartalika Wishes In Marathi 2025 – हरितालिका तृतीयेच्या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. एवढेच नाही तर अखंड सौभाग्याची कामना करून विवाहित महिला व अविवाहित मुली या दिवशी निर्जला व्रत करतात. महिलांसाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा समजला जातो, धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने हे व्रत केले होते. या व्रतामुळेच त्यांना भगवान शंकरासारखा भोळा पती मिळाला, अशी आख्यायिका सांगितली जाते. या पवित्र तिथीला माता पार्वतीने तपश्चर्या करून महादेवाला प्राप्त केलेल्या प्रेमाची प्रेरणा घेऊन, तुमच्या जीवनात सुख, शांति आणि समृद्धी येऊ दे.
तर चला तर मग, हरतालिका तृतीयेनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Hartalika Quotes In Marathi 2025 –
अखंड सौभाग्याचे प्रतीक, हरतालिका पूजन,
चला करुया साजरा हा दिवस
हरतालिकेच्या शुभेच्छा…!
शिव व्हावे प्रसन्न, पार्वतीने द्यावे सौभाग्यदान
हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा…!
संकल्प शक्तीचे प्रतीक, अखंड सौभाग्याची प्रार्थना,
हरतालिका सणानिमित्त पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
हरतालिका सणाच्या शुभेच्छा…!
हरतालिका सण हा आला सौभाग्याचा,
पार्वतीप्रमाणे आयुष्यात येवो भगवान शंकर सगळ्यांच्या,
हरतालिका सणाच्या शुभेच्छा…!
पार्वतीप्रमाणे व्रत करुन मिळवा, तुमच्या जीवनात आनंदी आनंद
दरवर्षी करा हरतालिका व्रत हे मनोभावे
हरतालिका सणाच्या शुभेच्छा…!
नाते अतुट हे जन्मोजन्मीचे मिळावे तुम्हाला सौभाग्याचे देणे,
हरतालिकेच्या शुभेच्छा…!
सण हा हर्षाचा, आनंदाचा, हरतालिका पूजन करण्याचा
हरतालिका सणाच्या शुभेच्छा…!