Happy Valentine’s Day Wishes In Marathi 2026 – व्हॅलेंटाईन वीकचा प्रत्येक दिवस जोडप्यांसाठी खास असतो. परंतु ज्या दिवसाची जोडपी आतुरतेने वाट पाहत असतात तो दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन डे दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. प्रेमाचा आणि आपुलकीचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे..! आजच्या या खास दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळते. प्रेम, विश्वास, आणि निस्सीम साथ यांचे सुंदर बंध या दिवशी आणखी घट्ट होतात. तुम्ही देखील तुमच्या जोडीसादारासमोर तुमच्या मनातील भावना व्यक्त करू इच्छित असाल तर येथे आम्ही काही रोमँटिक संदेश देत आहोत.
तर चला तर मग, व्हॅलेंटाईन डेनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Happy Valentine’s Day Quotes In Marathi 2026 –
प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं खास नातं असतं..
Happy Valentine Day…
“आजचा दिवस आहे खास, जन्मभर मिळो मला तुझा सहवास…
Happy Valentine’s Day…!
ओठात गुदमरलेले शब्द
अलगद डोळ्यांकडे वळले
पापण्या जरा थरथरल्या
म्हणून गुपित तुला कळले..
Happy Valentine Day…
न सांगताच तू , मला उमगते सारे
कळतात तुलाही, मौनातील इशारे
दोघात कशाला मग, शब्दांचे बांध
कळण्याचा चाले कळण्याची संवाद..
Happy Valentine Day…!
आजही तो दिवस आठवतो
ज्या दिवशी तू दिसली
सुकलेल्या मनामध्ये जणू
गुलाबाची कळी फुलली..!
Happy Valentines Day…
तुला माझ्या आठवणीत,
हसताना पाहायचंय
जीवनाचं सुंदर स्वप्न मला,
आता तुझ्याचसोबत जगायचंय..
Happy Valentines Day..!
संगीत जुनच आहे,
सूर नव्यानं जुळत आहेत,
मनही काहीसं जुनच,
तेही नवी तार छेडत आहेत..
Happy Valentines Day..!