Gokulashtami Wishes In Marathi 2025 – “गोकुळात रंग खेळतो हरी..!”, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे म्हटले जाते. पहिल्या दिवशी जन्माष्टमी आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते. गोकुळाष्टमी हा शब्द ‘गोकुळ’ आणि ‘अष्टमी’ या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. ‘गोकुळ’ म्हणजे भगवान कृष्णाचे बालपण जिथे गेले ते ठिकाण आणि ‘अष्टमी’ म्हणजे महिन्यातील आठवा दिवस. महाराष्ट्रामध्ये, गोकुळाष्टमीचा उत्सव ‘दहीहंडी’ च्या उत्साहाने साजरा केला जातो. उंच ठिकाणी दही आणि लोणी भरलेली हंडी बांधली जाते. तरुण गोविंदा पथक मानवी मनोरे तयार करून ती हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात.
तर चला तर मग, गोकुळाष्टमीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Gokulashtami Quotes In Marathi 2025 –
हाथी घोडा पालखी.. जय कन्हैया लालकी,
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…!
गोकुळात होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रसला रास, यशोदा,देवकी होत्या ज्याच्या माता, तोच साऱ्या जगाचा लाडका कृष्ण कन्हैया,
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…!
जन्माष्टमी आली, पुन्हा लोण्याचा गोडवा घेऊन आली, कान्हाची किमया न्यारी, दे आम्हाला तू आशीर्वाद
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा…!
पुत्रातील पुत्र श्रीकृष्ण बासरीवाला ज्याच्या लीलांना सगळ्यांना भुरळ तो परम प्रिय नंदलाला
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा…!
कृष्ण मुरारी नटखट भारी माखनचोर जन्मला रोहिनी नक्षत्राला देवकी नंदाघरी बाळ तान्हे तेजस्वी मोहूनी घेती सर्व मिळूनी पाळणा गाती
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा…!
राधाची भक्ती, बासुरीची गोडी लोणीचा स्वाद आणि,गोपींचा रास सर्व मिळून साजरा करू गोकुळाष्टमीचा दिवस खास…
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…