Ghatasthapana Wishes in Marathi | घटस्थापनेच्या शुभेच्छा

Ghatasthapana Wishes In Marathi 2025 – “सर्व मंगल मांगल्ये..”, हिंदू सणांमध्ये नवरात्री चा सण हा अतिशय महत्वाचा सण आहे. नवरात्रीची सुरुवात घटस्थापना पासून होते. नवरात्रीत देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते, नवरात्र चे नऊ दिवस देवी ची प्रतिमा स्थापित करून शक्ति ची पूजा, आराधना केली जाते व गरबा-दांडीया खेळून हा उत्सव साजरा केला जातो.
तर चला तर मग, घटस्थापनेनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास घटस्थापनेच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Ghatasthapana Quotes In Marathi 2025 –

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते..
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

घटस्थापनेचा हा दिवस व आज पासून सुरू होणारी नवरात्र
आपल्या जीवनात नवचैतन्य,
सुख शांती व प्रेमाची वृद्धि करो, हीच आमच कामना
आपणास नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा…

शक्ती अंगी येते आई तुझे नाव घेता,
चैतन्य अंगी येते तुझे रूप पाहता,
संकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होता..
सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा…

न – नवीन चैतन्याची दाता
व – वरदान देती भक्ता
रा – रात्र दिवस भक्तांसाठी सज्ज असणारी माता
त्री – त्रिकाल रक्षण करती..
अशा सर्व रूपात असणाऱ्या देवीला वंदन करून सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

स्त्री म्हणजे चैतन्याचे रूप
स्त्री म्हणजे अभिमानाची ज्योत
स्त्री म्हणजे कुटुंबाची छाया
स्त्री म्हणजे प्रेमळ माया
अशा स्त्री स्वरूप सर्व देवींना पूजून सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

close