Ganpati Visarjan Wishes in Marathi | अनंत चर्तुदशीच्या शुभेच्छा

Ganpati Visarjan Wishes In Marathi 2025 – ।। गणपती बाप्पा मोरया ।। पुढच्या वर्षी लवकर या…, गणेशोत्सवातील सर्वात भावूक करणारा क्षण म्हणजे गणपती विसर्जन. अवघे दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा आणि अर्चना केली जाते. गणपतीची मूर्ती घरात किंवा सार्वजनिक मंडपात बसवली जाते. विविध पूजा, आरती, आणि लाडक्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. उत्सवाचा शेवट बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीने होतो. गेल्या 10 दिवसांपासून अख्खा देश गणेशमय झालं होतं. मोठ्या उत्साहात गणरायाच आगमन करुन त्याला मनोभाव पाहुणचार करुन आता त्याला जड अंतरकरणाने निरोप देण्याची वेळी आली. आज अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जाणार आणि पुढच्या वर्षी लवकर याची विनंती केली जाणार. गणपती जसा वाजत गाजत येतो तसा त्याचा निरोप समारंभ सुद्धा तितकाच वाजत गाजत होतो.
तर चला तर मग, अनंत चर्तुदशीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास अनंत चर्तुदशीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Ganpati Visarjan Quotes In Marathi 2025 –

।। गणपती बाप्पा मोरया ।। पुढच्या वर्षी लवकर या…

निरोप देतो आता देवा आज्ञा असावी चुकले आमचे काही देवा क्षमा असावी..
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा…!

आभाळ भरले होते तुम्ही येताना आता डोळे भरलेत पाहून तुम्हाला जातांना अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा…!

तुझ्या येण्यान गणराया घर माझं आनंदात नाहून जातं अनंत चतुर्दशी चा निरोप तुला देतांना मन माझं भरून येतं अनंत चतुर्दशीच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा…

सुख समृद्धीसाठी प्रार्थना माझी तुझ्या चरणी, हात जोडूनी क्षमा मागतो कळत नकळत झालेल्या चुकांची, भजन गाणी आम्ही गाऊ, ढोल ताश्यात पुन्हा तुला आणू, मोदक करंज्या खायला ये, खेळ खेळू आणि जल्लोष करू
अनंत चतुर्दशीच्या सर्वांना शुभेच्छा…

रिकामं झालं घर, रिता झाला मखर,
पुढल्या वर्षी लवकर येण्यास, निघाला लंबोदर,
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा…

“बाप्पा तुझा हात सदैव आमच्या माथी असू दे,
तुझी साथ जन्मोजन्मी पाठीशी असू दे,
आनंद येऊ दे घरी, प्रत्येक कामात यश मिळू दे..
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!
अनंत चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा..!”

close