Friendship Day Wishes in Marathi | मैत्री दिनाच्या शुभेच्छा

Friendship Day Wishes In Marathi 2025 – दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑगस्टचा पहिला रविवार हा जागतिक मैत्री दिन अथवा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. मैत्री एक हवंहवंसं वाटणारं आपुलकीचं नातं. मैत्रीच्या नात्यात कोणतीही बंधन नसतात. जगातील सर्व नात्यांच्या पलीकडे असलेलं मैत्रीचं नातं आयुष्यभर साथ देतं. मैत्रीचे हे बंध एकमेकांशी कधी जुळतात हे कोणालाच कळत नाहीत. मैत्री, दोस्ती, यारी, जिगरा… निःस्वार्थी आणि रक्तापलिकडील या नात्याची अशी कित्येक नाव आहेत. सुख-दुःखाच्या क्षणांमध्ये कायम सोबत असतात ते म्हणजे आपले मित्र. कोणत्याही परिस्थिती ही मंडळी आपल्या पाठीशी नेहमीच असतात. योग्य मार्गदर्शन, छोट्या-छोट्या समस्या सोडवण्यासाठी आपणही आपल्या मित्र-मैत्रिणींवर अवलंबून असतो.
तर चला तर मग, मैत्री दिनानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास मैत्री दिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Friendship Day Quotes In Marathi 2025 –

मैत्री हसवणारी असावी, मैत्री चिडवणारी असावी,
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी, एक वेळेस ती भांडणारी असावी..
पण कधीच बदलणारी नसावी.. मैत्री दिनाच्या शुभेच्छा…!

वारा बेधुंद, दुनियादारीचा गंध, फुलांचा सुगंध आणि आपले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध.. हॅपी फ्रेंडशिप डे…!!!

मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणिव, कारण या नात्याने भरून निघते आयुष्यातील उणीव.. मैत्री दिनाच्या शुभेच्छा…!!

शब्दांपेक्षा सोबतीत जास्त सामर्थ्य असतं, मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असतं.. मैत्री दिनाच्या शुभेच्छा…

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नाही, आनंदात हसण्याची आणि दुःखात रडण्याची गरज नाही ते नातं म्हणजे मैत्री.. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

आयुष्यात अनेक लोक येतात आणि जातात पण एक मैत्रीण अशी असते जी कायम ह्रदयात घर करून राहते.. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

मैत्री ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी असावी,
एकाने गरीबीतही स्वतःचा कधीच स्वाभिमान सोडला नाही
आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही… मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

जन्म हा थेंबासारखा , आयुष्य ओळीसारखं असतं
प्रेम त्रिकोणासारखं असतं, मैत्री मात्र वर्तुळासारखी असते, कारण, मैत्रीला शेवट नसतो..
मैत्री दिनाच्या शुभेच्छा…!!

close