Children’s Day Wishes In Marathi 2025 – “लहानपण देगा देवा..!”, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस १४ नोव्हेंबर भारतभर साजरा केला जातो. पंडित नेहरूंना मुलांवर खूप प्रेम होते आणि मुले त्यांना “चाचा नेहरू” म्हणत असत. मुलांप्रती असलेले त्यांचे प्रेम आणि आपुलकी यामुळे त्यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. या दिवशी मुलांच्या आनंदाला आणि निरागसतेला ओळख दिली जाते.
तर चला तर मग, बालदिनानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास बालदिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Children’s Day Quotes In Marathi 2025 –
मुलं म्हणजे पाखरांची चपळता,
मुलं म्हणजे पाटेची सौम्य उज्ज्वलता मुलं म्हणजे झऱ्याचा खळखळाट,
मुलं म्हणजे आनंद उत्साहाचा स्त्रोत,
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
जगातील सर्वोत्तम दिवस, जगातील सर्वोत्तम वेळ,
जगातील सर्वात सुंदर क्षण, बालपणातच सापडतात.
बालदिनाच्या शुभेच्छा…
बालपणीचा तो काळ सुखाचा खजिना होता.
मला चंद्रावर जायचे होते पण माझ्या मनाला फुलपाखरांचे वेड होते..
बालदिनाच्या शुभेच्छा…
थोडा टेंशनला ब्रेक देऊया, रोजचं काम थोडं दूर ठेवूया,
तर्कबुद्धीला आराम देऊया, आज थोडं लहान होऊया,
बालदिनाच्या शुभेच्छा…
बालपणीची जादू,ते सुंदर जग, प्रत्येक पावलावर आनंद,
प्रत्येक हास्यात रंगत असते..
बालदिनाच्या शुभेच्छा…!
बालपणीचा तो काळ सुखाचा खजिना होता.
मला चंद्रावर जायचे होते
पण माझ्या मनाला फुलपाखरांचे वेड होते..
बालदिनाच्या शुभेच्छा…
बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण, बालपणीच्या आठवणीत हरवते मन,
कधीच येणार नाहीत ते निरागस क्षण,
बालदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा…!