Champa Shashti Wishes in Marathi | चंपा षष्ठीच्या शुभेच्छा

Champa Shashti Wishes In Marathi 2025 – “येळकोट येळकोट जय मल्हार..”, मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी चंपा षष्ठी म्हणून ओळखली जाते. हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांचे ज्येष्ठ पुत्र कार्तिकेय आणि खंडोबालाना समर्पित आहे. जेजुरी येथील खंडोबा मंदिरात चंपाषष्टीचा उत्सव मोठ्या थाटामाटात आयोजित केला जातो. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. यानिमित्ताने खंडोबाची तळी उचलली जाते आणि त्यात फळे, भाजीपाला समावेश केला जातो. खंडोबाचा जयघोष करताना भंडारा उधळला जातो.
तर चला तर मग, चंपा षष्ठीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास चंपा षष्ठीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Champa Shashti Quotes In Marathi 2025 –

सदानंदाचा येळकोट, बोला हर हर महादेव,
चिंतामणी मोरया, आनंदाचा भैरोबाच्या नावानं चांगभलं,
बोला सदानंदाचा येळकोट..
जय मल्हार.. चंपाषष्टीच्या शुभेच्छा…!

“सदानंदाचा येळकोट, बोला हर हर महादेव..!
चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा..!”

मल्हारी मार्तंड जय मल्हार, श्री कुलदेवताय नमः,
चंपाषष्टीच्या हार्दिक शुभेच्छा..

भेट शोभे डोईवर, कास पिवळा पितांबर,
घोड्यावर ऐटदार मूर्ती शोभली, खंडोबाची मूर्ती माझ्या मनात भरली..
चंपाषष्ठीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

कारभारी आनंद झालाय मनाला, मला जायाच जेजुरी गडाला,
चंपाषष्ठीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…

“चिंतामणी मोरया, आनंदाचा भैरोबाच्या नावानं चांगभलं..!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला चंपाषष्ठीच्या खूप खूप शुभेच्छा…”

माझ्या मल्हारी मार्तंडाची नगरी
उजळे पिवळी सोन्याची जेजुरी..
चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा…

दिनांचा राजा देव हा माझा
भोळा शिव मल्हारी
चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा…

close