Chaltay Ki Song Lyrics – Prashant Nakti

चालतय की.. Chaltay Ki Lyrics is a Marathi song. This is a Marathi song sung by Abhay Jodhpurkar & Sonali Sonawane. The lyrics by Prashant Nakti and music composition of Prashant Nakti. Featuring Abhay Jodhpurkar & Sonali Sonawane.

Chaltay Ki Song Details:
Song: Chaltay Ki
Movie/Album: –
Singers: Abhay Jodhpurkar & Sonali Sonawane
Lyricist: Prashant Nakti
Musician: Prashant Nakti
Cast: Ritesh Kamble & Srushti Zemse
Music on – Zee Music Company

Enjoy The Superhit Song ‘Chaltay Ki‘ Video Song and Lyrics

पाहिलं मी तुला गं, रूप साठले लोचनी,
एकांताचा तिढा गं, सुटला हा तुला पाहुनी,

साथ तुझी देना मला या जीवनी,
सोनियाच्या पावलानी येशील कधी,
पोरी मला चालतय की, तुझ्या संगतीनं जीनं खुशाल,
पोरी कळतय की, तुझ्या मनात दडलय काय..
पोरी मला चालतय की…

देवाजीच्या किरपेनं, तू मला भेटली,
पीरमाची ज्योत, माझ्या मनामंदी पेटली,
हुरहूर काळजात, तुझ्यामुळे साजनी,
भान माझे हरपून जाते, रूप तुझे पाहुनी,
वाहणारा वारा हा, आसमंत सारा हा,
माझ्या प्रेमाची देती ग्वाही,
सागराच्या लाटा या, नागमोडी वाटा या,
वाट तुझ्या येण्याची गं पाही,
तुला गं पाहुनी, माझ्या या मनात, घडतय बरंच काही,
पोरी मला चालतय की, तुझ्या संगतीनं जीनं खुशाल,
पोरी मला कळतय की, तुझ्या मनात दडलय काय..
पोरी मला चालतय की…

आभास तुझा रं, होतो मला का?
नजर का शोधते तुला, सांग साजना..
वादळे मनात, उठतात का रं,
पहिले प्रेम झाले वाटते, आज मला,
अरे सगळच वाटतय भारी,
वाटे गुलाबी दुनिया सारी,
अरे तुझ्याच साठी मी वेडी,
आपली एक नंबर जोडी,
तुला रं पाहूनी, माझ्या या मनात,
घडतय बरंच काही,
पोरा मला चालतय की, तुझ्या संगतीनं जिणं खुशाल,
पोरा मला कळतय की, तुझ्या मनात दडलय काय..
पोरा मला चालतय की…

close