Bhaubeej Wishes In Marathi 2025 – “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती..”, दिवाळीच्या काळात भावा-बहिणींना प्रतिक्षा असते ती भाऊबीज सणाची. भाऊबीज हा सण यम द्वितीया म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवशी यम देवतेचीही पूजा केली जाते. भाऊबीज हा पवित्र सण भाऊ आणि बहिणीचे पवित्र नात्याचा सण आहे. या दिवशी बहिणी भावाला टिळक लावतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, त्यानंतर भाऊ बहिणीच्या आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. या सणाच्या निमित्ताने औक्षण करते आणि भाऊ तिला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देतो.
तर चला तर मग, भाऊबीजनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास भाऊबीजच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Bhaubeej Quotes In Marathi 2025 –
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहीणीची
वेडी ही माया भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!
बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात..
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा…!
चंदनाचं उटणं, तुपाचा दिवा,
भावाचं औक्षण आणि बहिणीचं प्रेम,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा…!
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे..!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे..
भाऊबीजेच्या शुभेच्छा…!
क्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख-लाख शुभेच्छा तुला, आज आहे बहीण भावाचा
पवित्र सण भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा…!
लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया..
तुझ्या घरी हे तेज येवो आणि तुझे घर आनंदाने भरो,
ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा…!
भाऊराया तुझ्या-माझ्या नात्याचे प्रेमाचे बंधन
माया आणि विश्वासाचे बंधन तुझ्या माथी लावते
चंदनाचा टिळा दादा तुझ्या दीर्घायुष्यासाठी
देवाकडे प्रत्येक क्षणी करते प्रार्थना…
भाऊबीजेच्या शुभेच्छा…!