Ahilyabai Holkar Jayanti Wishes In Marathi 2025 – “पुण्यश्लोक, राजमाता”, अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेडेगावात झाला होता. अहिल्यादेवींनी लहानपणापासूनच तल्लख बुद्धिमत्ता आणि चाणाक्षपणा दाखवला. पतीच्या निधनानंतर त्यांनी 1767 ते 1795 या काळात मराठा साम्राज्यातील होळकर संस्थानाचे कुशलतेने नेतृत्व केले. अहिल्यादेवींनी भारतभर अनेक हिंदू मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि पाणपोया बांधल्या. अहिल्यादेवी त्यांच्या निष्पक्ष आणि तत्त्वनिष्ठ प्रशासनासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी प्रजेवर जास्त करांचा बोजा न लादता राज्याचा खजिना समृद्ध ठेवला. सर्वधर्मसमभाव, अस्पृश्यता निर्मूलन, हुंडा पद्धतीचे उच्चाटन आणि सामाजिक एकतेचा पुरस्कार करणाऱ्या त्या खऱ्या अर्थाने समाजसुधारक होत्या.
तर चला तर मग, अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास अहिल्याबाई होळकर जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा…
धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधुता, समता व न्याय या तत्त्वांप्रमाणे राज्यकारभार केला
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…!
आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचणाऱ्या
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!
असामान्य कर्तृत्व, उत्तम शासक, प्रजापालक, वीरांगना
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथी निमित्त नमन…!
नारीशक्तीचा आदर्श, अहिल्याबाई होळकर यांना
जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम..!
न्याय, धर्म आणि सेवेचा अहिल्याबाईंचा वारसा कायम प्रेरणा देतो.
जयंतीनिमित्त अभिवादन…!