बाप विठूराया.. Baap Vithuraya Lyrics is a Marathi song. This is a Marathi Movie song sung by Ajay Gogavale. The lyrics by Hrishikesh Vidar and music composition of Padmanabh Gaikwad. This song featuring Rinku Rajguru.
Song Details:
Song: Baap Vithuraya
Movie/Album: Baap Vithuraya
Singers: Ajay Gogavale
Lyricist: Hrishikesh Vidar
Musician: Padmanabh Gaikwad
Cast: Rinku Rajguru.
Music on : Saregama Marathi
Enjoy The Superhit Song ‘Baap Vithuraya‘ Video Song and Lyrics
देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी,
तेणे मुक्ती चारी साधियेल्या…
हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा,
पुण्याची गणना कोण करी…
श्वासांत विठ्ठल, देहात विठ्ठल
स्नेहात विठ्ठल, ओथंबला…
डोळ्यांत विठ्ठल, आशेत विठ्ठल
हृदयात विठ्ठल, ओसंडला…
मेघांत विठ्ठल, भूमीत विठ्ठल
जीवांत विठ्ठल, बा सावळा…
बोलतो विठ्ठल, पाहतो विठ्ठल..
हा देखणा सोहळा…
तोच माय, तोच बाप विठुराया, पंढरीचा…
आलो भेटीला सख्या श्रीरंगा, रे विठ्ठला…
रूप पाहतां लोचनी,
सुख जाले वो साजणी
तो हा विठ्ठल बरवा,
तो हा माधव बरवा…
विठुनामाचा गजर
डोईवरी ती तुळस
पंढरीचा रे कळस
पाहता हर्ष डोळ्यांतूनी दाटला…
वारी माझ्या विठ्ठलाची
जन्मजन्माच्या सुखाची
जगण्याच्या रिंगणाची
पांडुरंगी असा जीव रे रंगला…
पाऊल बाळाचे धावते मातेसी
तैसे विठूपासी जाणे आम्हां…
सागरा शेवटी जैसी नदी जाय
तैसे विठूमय होणे आम्हां..
सांगतो विठ्ठल, ऐकतो विठ्ठल
हा देखणा सोहळा…
तोच माय तोच बाप विठुराया पंढरीचा
आलो भेटीला सख्या श्रीरंगा रे विठ्ठला…
रूप पाहतां लोचनी,
सुख जाले वो साजणी
तो हा विठ्ठल बरवा..
तो हा माधव बरवा…