Ganesh Jayanti Wishes In Marathi 2026 – ।।गणपती बाप्पा मोरया।।, हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हणून ओळखली जाते. गणेश जयंतीच्या दिवशी लोक विधीनुसार गणपतीची पूजा करतात. भगवान गणेशाला ज्ञानाचे स्वामी म्हणून ओळखले जाते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी भगवान गणेशाची पूजा केली जाते. ज्या दिवशी गणपती बाप्पा पुन्हा जिवंत झाले तो दिवस माघ महिन्यातील माघ शुद्ध चतुर्थीचा (अमावास्या नंतरच्या त्या महिन्याचा चौथा दिवस) होता. म्हणून, हा दिवस माघी गणेश उत्सव म्हणून साजरा केला जातो.
तर चला तर मग, माघी गणेश जयंतीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Ganesh Jayanti Quotes In Marathi 2026 –
।। गणपती बाप्पा मोरया।।
ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात।।
माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा…!
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा..!
अवघी सुष्टी करतेय नमन
होतयं माझ्या बाप्पाचे आगमन
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा..!
।। गणपती बाप्पा मोरया।।
मोदकांचा प्रसाद, लाल फुलांचा हार,
नटून – थटून बाप्पा तयार,
वाजत गाजत बाप्पा घरात,
सर्व गणेश भक्तांना माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा…!
मोरया मोरया गोड हे नाम तुझे |
कृपा सागरा हेची माहेर माझे ||
तुझी सोंड बा वाकुडी एकदंता |
मला बुद्धी दे मोरया गुणवंता ||
सर्व गणेश भक्तांना माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा…!
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव सर्वांना…
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा…!
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुष्कामार्थसिद्धये ॥
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा..!
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका |
भक्तिने स्मरता नित्य आयु:कामार्थ साधती ||
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा..!