Balasaheb Thackeray Jayanti Wishes in Marathi – बाळासाहेब ठाकरे जयंतीच्या शुभेच्छा

Balasaheb Thackeray Jayanti Wishes In Marathi 2026 – “जय महाराष्ट्र..!”, “हिंदुहृदय सम्राट”, शिवसेनाप्रमुख श्री बाळ केशव ठाकरे (बाळासाहेब ठाकरे) यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुणे येथे झाला. बाळासाहेब ठाकरे हे एक धुरंदर राजकारणी, उत्तम व्यंगचित्रकार व सामना या वृत्तपत्राचे संस्थापक, संपादक होते. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बाळासाहेबांनी संघर्ष केला. हिंदुत्वाची पताका फडकवत ठेवणारा बुलंद आवाज अशी त्यांची ओळख होती. आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमीच चर्चेत रहायचे. त्यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली आणि सत्ता देखील मिळवली. हिंदूंसाठी त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना हिंदूहृदय सम्राट असे संबोधले जाऊ लागले.
तर चला तर मग, बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास बाळासाहेब ठाकरे जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Balasaheb Thackeray Jayanti Quotes In Marathi 2026 –

“बाळासाहेब ठाकरे: व्यंगचित्रकार ते शिवसेनाप्रमुख,
महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेले नाव..
बाळासाहेब ठाकरे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!”

“अभिमानाचे प्रतीक, हिंदुत्वाचे आधारस्तंभ,
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन..! जय महाराष्ट्र..!”

“मराठी माणसाच्या मनात हिंदुत्वाची ज्वाला पेटवणारे,
महाराष्ट्राचे लाडके नेते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम…!”

एकजुटीने राहा, जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा.
तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्रही टिकेल..
बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…

हवसे, नवसे, खूप असतील
बाळ नावाचा बाप म्हणजे बाळासाहेब
नाव तर बाळ होत पण…
दुश्मन आजही बाप म्हणूच ओळखतात..
बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…

तुकडयांसाठी शेपूट हलवाल
तर कुत्र्याची मौत मराल,
हिंदू म्हणून राहाल तर वाघासारखे जगाल..
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम…!

जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका,
कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही…
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम…!

माझ्या वडिलांच्या संस्कारामुळे
भीती नावाचा शब्द
माझ्या शब्दकोशात नाही…
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम…!

close