अगं अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई.. Aga Aga Sunbai Kay Mhanata Sasubai – Title Track Lyrics is a Marathi song. This is a Marathi Movie song sung by Vaishali Samant & Priyanka Barve. The lyrics by Valay Mulgund and music composition of Kunal Karan. Featuring Nirrmite Saawaant & Prarthana Behere.
Song Details:
Song: Aga Aga Sunbai Kay Mhanata Sasubai – Title Track
Movie/Album: Aga Aga Sunbai Kay Mhanata Sasubai
Singers: Vaishali Samant & Priyanka Barve
Lyricist: Valay Mulgund
Musician: Kunal Karan
Cast: Nirrmite Saawaant & Prarthana Behere
Music on – Saregama Marathi & Zee Studios
Enjoy The Superhit Song ‘Aga Aga Sunbai Kay Mhanata Sasubai – Title Track‘ Video Song and Lyrics
सासूची भुणभुण.. सुनेची फुणफुण
सासूची तडतड.. सुनेची तणतण..
मुखडा :
सून :
तुपात तळलं.. साखरेत घोळलं
कडू हे कारलं कडूच राहिलं
सासू :
वरून साळसूद महाबिलंदर
ढालगज ढोंगी डँबिस एक नंबर
सासू :
डोक्याला शॉट कुचकट कटकटी धोंड
सून :
चेटकीण वेडी हिटलर आगाऊ कोण?
सासू :
अगं अगं सुनबाई..!
सून :
काय म्हणताय सासूबाई?
अंतरा ०१ :
सून :
शातिर तू.. डेंजर तू.. नाचवतेस गरगरगरगर..
शेरास तर सव्वाशेर मी
सासू :
आलीस जर अंगावर बेहत्तर गुरगुर गुरगुर..
शिंगावर घेणार मी
सून :
मोडशील पण वाकणार नाही तू
असा तुझा ताठा
सासू :
तोरा मिरवतेस मोठा तू
कांगावा करतेस खोटा..
सासू :
डोक्याला शॉट कुचकट कटकटी धोंड
सून :
चेटकीण वेडी हिटलर आगाऊ कोण?
सासू :
अगं अगं सुनबाई..!
सून :
काय म्हणताय सासूबाई?
अंतरा ०२ :
सासू :
पदरात पडलंय ध्यान वेंधळं
सून :
हलक्यात घेऊ नको मी तर वादळं
सासू :
सुनामी येताच माझी झाला तुझा राडा
सून :
नुसताच तू बुडबुडा
सासू :
सुमार अकलेचा कांदा तू, नर्मदेचा गोटा
सून :
साडेसातीचा फेरा तू, पिच्छा सोडेना येता जाता
सासू :
डोक्याला शॉट कुचकट कटकटी धोंड
सून :
चेटकीण वेडी हिटलर आगाऊ कोण?
सासू :
अगं अगं सुनबाई..!
सून :
काय म्हणताय सासूबाई?