Kartik Purnima Wishes In Marathi 2025 – कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला ‘कार्तिकी पौर्णिमा’ म्हणतात. या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा देखील म्हणतात. कार्तिक पौर्णिमेला देवी लक्ष्मी आणि प्रभू नारायणाची पूजा केली जाते. या दिवशी स्नान आणि दान करण्याला खूप महत्त्व आहे. या दिवशी दिवाळीप्रमाणे सर्वत्र दिवे दान करून देव दिवाळी साजरी केली जाते. भगवान शंकराने त्रिपुरासुर राक्षसाचा वध या दिवशी केला होता. म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरासर पौर्णिमा असेही म्हणतात. कार्तिक पौर्णिमेपर्यंत भगवान विष्णू माशाच्या रुपात पाण्यात विराजमान असतात. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेला पाण्यात दिवा लावण्याची मोठी श्रद्धा आहे.
तर चला तर मग, कार्तिक पौर्णिमेनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास कार्तिक पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Kartik Purnima Quotes In Marathi 2025 –
ॐ नमो भगवते वासुदेवाय! कार्तिक पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…!
सौभाग्याचे दीप उजळती, मांगल्याची चाहूल लागली शब्दांचीही सुमने फुलती,
येता घरोघरी देव दीपावली देव दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमेच्या शुभेच्छा…!
कार्तिक पौर्णिमेच्या सणाला उजळू दे आकाश,
सर्वत्र पसरू दे सकारात्मकतेचा लख्ख प्रकाश,
जुळावे नवे बंध प्रेमाचे आणि आनंदाचे हीच इच्छा,
कार्तिक पौर्णिमेच्या तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा…!
नदीच्या तिरी असंख्य दिव्यांची आरास
त्रिपुरारी ठरो सर्वांसाठी लाभदायक
त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा…!
देव तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करो,
तुम्हाला उत्तम आरोग्य, धन-संपत्ती लाभो,
तुमच्यावर सर्वांकडून प्रेमाचा वर्षाव होवो,
कार्तिक पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
शंकरपूजा, देवपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षाला,
वंदन करुया मनोभावे आज त्या मांगल्याचा
त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा…!
तिमिरातून तेजाकडे नेणारा सण,
दाखवतो प्रकाशाची वाट, उगवते कर्तृत्वाची पहाट,
नवी उमेद काजळी पुसण्याची,
नात्यांचे रेशीम बंध घट्ट करण्याची,
त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!
स्नेहाचा सुगंध दरवळला, देव दिवाळीचा सण आला,
एकच मागणे या कार्तिक पौर्णिमेला, सौख्य समृद्धी लाभो सर्वांना
त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा…!