Dhantrayodashi Wishes In Marathi 2025 – धनत्रयोदशी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. वसुबारसनंतर दिवाळीचा दुसरा सण म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशी, ज्याला धनतेरस असेही ओळखले जाते, संध्याकाळच्या वेळी भगवान धन्वंतरीची विधीवत पूजा केली जाते. तसेच यमदीपदान देखील केले जाते. संपूर्ण घर दिव्यांनी आणि कंदिलांनी प्रकाशित करून ते सजवले जाते. या दिवशी धन्वंतरी, लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते, ज्यामुळे आरोग्य, धन आणि समृद्धीची प्राप्ती होते. या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा समृद्धीच्या प्रतीक म्हणून केली जातं.
तर चला तर मग, धनत्रयोदशीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास धनत्रयोदशीच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Dhantrayodashi Quotes In Marathi 2025 –
आज धनत्रयोदशी..! दिवाळी सणाचा दुसरा दिवस..
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
सम्रुद्धीची व भरभराटिची जावो..
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा,
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा..!
अंगण सजले फुल आणि रांगोळ्यांनी, स्वागत करण्यास दिवाळसणाची,
तोरणे आकाश कंदिल लागले दारी.. आली आली दिवाळी आपुल्या घरी..
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…!
धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी,
कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी,
फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी,
मिळून सारे साजरे करू आली रे आली दिवाळी आली..
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…
घेऊनि दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधूर उटण्याचा,
करा संकल्प सुंदर जगण्याचा.. गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…!
धनत्रयोदशीने होते सुरुवात, आज या दीपपर्वाची..
समस्त मित्रपरिवारांना,
ही दिवाळी जावो सुख-सम्रुद्धीची..
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा..!