Ganesh Chaturthi Wishes In Marathi 2025 – ।। गणपती बाप्पा मोरया ।।, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी गणरायाचे वाजत – गाजत, ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन होते. अवघे दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा आणि अर्चना केली जाते. गणपतीची मूर्ती घरात किंवा सार्वजनिक मंडपात बसवली जाते. विविध पूजा, आरती, आणि लाडक्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. उत्सवाचा शेवट बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीने होतो.
तर चला तर मग, गणेश चतुर्थीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Ganesh Chaturthi Quotes In Marathi 2025 –
।। गणपती बाप्पा मोरया ।।
वक्रतुण्ड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा ।।
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा…!
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुष्कामार्थसिद्धये ॥
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा…!
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका |
भक्तिने स्मरता नित्य आयु:कामार्थ साधती ||
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा…!
ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात।।
गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा…!
ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरू गणेश।
ग्लौम गणपति, ऋदि्ध पति, सिदि्ध पति। मेरे कर दूर क्लेश।।
गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा…!
मोरया मोरया गोड हे नाम तुझे | कृपा सागरा हेची माहेर माझे ||
तुझी सोंड बा वाकुडी एकदंता | मला बुद्धी दे मोरया गुणवंता ||
सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा…!
मोदकांचा प्रसाद, लाल फुलांचा हार,
नटून – थटून बाप्पा तयार, वाजत गाजत बाप्पा घरात,
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा…!
वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव सर्वांना…
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा…!
बाप्पाच्या आगमनाने घरात सुख, समृद्धी, शांती आणि आनंद येवो. तुमच्या आयुष्यातील क्षण मोदकाप्रमाणे गोड आणि आनंदाचे असोत..
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत..! सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा…!