Bail Pola Wishes In Marathi 2025 – “जिवा शिवाची बैल जोडं, लाविल पैजंला आपली कुडं”, महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सांगता बैल पोळा व पिठोरी अमावस्येने होते. पोळा हा एक सण आहे आणि या सणामध्ये शेतकरी गाय आणि बैलांची पूजा करतात. हा पोळा सण विशेषतः छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात साजरा केला जातो. बैलपोळा हा दिवस महाराष्ट्रात अतिशय उत्साहात, आनंदात साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक शेतकरी आपल्या आवडीने आणि ऐपतीने बैलाला सजवतो, त्याला साजश्रृंगार करतात. घरात गोडाचं जेवण बनवून बैलांची पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. सोबतच या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून आराम दिला जातो.
तर चला तर मग, बैलपोळानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास बैलपोळाच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Bail Pola Quotes In Marathi 2025 –
झुलं, शेंब्या, चाळ, घुंगरं, तिफन, कुळव, शिवाळ, शेती अवजारांचा आज थाट,
औताला सुट्टी,सर्जा- राजा आनंदात, शेतकरी बांधवांना बैलपोळाच्या शुभेच्छा…!
शिंगे घासली बाशिंगे लावली, माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला, घुंगरूंमाळा वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा.. पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!
बैल पोळ्याचा हा सण,
सर्जा राजाचा हा दिन..
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन,
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण..
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
आज पुंज रे बैलाले, फेडा उपकाराचं देनं.. बैला, खरा तुझा सन, शेतकऱ्या तुझं रीन..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…
आला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा,
सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा,
बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
सण आला आनंदाचा, माझ्या सर्जा राजाचा, ऋणं त्याचे माझ्या माथी,
सण गावच्या मातीचा, बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!
कष्टाशिवाय मातीला.. बैलाशिवाय शेतीला.. अन् बळीराजाशिवाय..
देशाच्या प्रगतीला पर्याय नाही.. बैलपोळा सणाच्या शुभेच्छा…
तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई एका दिवसाच्या पूजेने बोई कसा उतराई..
सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा…
शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला, आज शांत निजू दे.. तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला,
तुझ्या डोळ्यात सजू दे.. बैलपोळ्याच्या शुभेच्छा..!
आज तुझ्यामुळे आहे माझ्या शेताला हिरवाई
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन, आज जरा घे थोडीशी विश्रांती,
आज करु दे तुझ्यासाठी सगळं काही, कारण तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई,
आपला सर्जाराजा शेतकर्याच्या सच्चा मित्राला
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…
वाडा शिवार सगळी वाडवडिलांची पुण्याई,
किती वर्ण तुझं गुणं मन मोहरुन जाई, तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई,
एका दिवसाच्या पुजेने होईल कसा उतराई
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…