Raksha Bandhan Wishes in Marathi | रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Raksha Bandhan Wishes In Marathi 2025 – “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती.. ओवाळते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी ही माया..!”, श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथी ही नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन देखील साजरे केले जाते. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला तिच्या रक्षणाचे वचन देतो. रक्षाबंधनच्या दिवशी भावाच्या हातावर सुंदरशी राखी बांधून बहिण भावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते आणि भाऊ बहिणीला आशीर्वाद व प्रेमाची भेट देतो. या सणाच्या निमित्ताने आपण आपल्या प्रिय भावाला किंवा बहिणीला प्रेमाने, आपुलकीने आणि मनापासून शुभेच्छा देतो.
तर चला तर मग, रक्षाबंधनानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Raksha Bandhan Quotes In Marathi 2025 –

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती.. ओवाळते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी ही माया..!
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

राखी बांधून हातात बहिण ओवाळे भावाला
भरून साखर तोंडात भाऊ जीव लावे बहिणीला
बहिण-भावाच्या प्रेमाचा झरा असाच वाहत राहो
दोघांच्या या नात्याला दीर्घायुष्य लाभो
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…

हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

एक धागा, एक विश्वास, हा सण प्रत्येक भावाबहिणीसाठी खास
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

बंध हा प्रेमाचा,नाव जयाचे राखी, बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे, भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे, म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

राखी हा धागा नाही नुसता, हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला..
आयुष्यात कुठल्याही क्षणी, कुठल्याही वळणावर,
कुठल्याही संकटात, हक्कानं तुलाच हाक मारणार,
विश्वास आहे माझा तुझ्यावरचा, रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा…!

बहिणीचं प्रेम हे अथांग समुद्रासारखं, निखळ असं नातं आयुष्यभर जपण्याचं,
बंधन नसतं कुठलं त्यात निर्मळ हास्याचं.. सोन्याहून सुंदर असं जगात आहे अनमोल,
नातं असं हे आपुलकीचं… भाऊ बहिणीच्या प्रेमाचं..
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा…!

close