Shravan Somvar Mahina Wishes in Marathi | श्रावणी सोमवार महिन्याच्या शुभेच्छा

Shravan Somvar Mahina Wishes In Marathi 2025 – “श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे”, हिंदू धर्मात श्रावणाला फार महत्व आहे. विशेषतः शिवभक्तांसाठी हा महिना अत्यंत श्रद्धेचा असतो. मंगलमय असा हा श्रावण महिना ज्यामध्ये मंगळगौर, सोळा सोमवार भगवान शिवाची उपासना, शनिवारचे उपवास, विविध धार्मिक पूजा आयोजित केली जातात. सणांनी भरभरून युक्त असा हा महिना मनात खूपच उल्हास निर्माण करतो.
तर चला तर मग, श्रावणी सोमवार महिन्यानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास श्रावणी सोमवार महिन्याच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Shravan Somvar Mahina Quotes In Marathi 2025 –

ओम नमः शिवाय – बम बम भोले
श्रावणी सोमवारच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

श्रावण मासाला झाला प्रारंभ करू शिवाच्या पूजेला आरंभ ठेऊ शिवाचे व्रत होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा…!

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती, ह्या श्रावण सोमवारच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो, हीच शंकराकडे प्रार्थना..
श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा…!

निसर्ग आलाय बहरून, मनही आलंय मोहरून रंगात तुझ्या नहाण्या, मन होई पाखरू पाखरू
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा…!

रंग रंगात रंगला श्रावण, नभ नभात उतरला श्रावण, पानापानात लपला श्रावण
फुलाफुलांत उमलला श्रावण – श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा…!

शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत, शिव ब्रम्ह आहे
शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती, श्रावणी सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!

close