Angarki Sankashti Chaturthi Wishes In Marathi 2025 – “गणपती बाप्पा मोरया”, संकष्टी चतुर्थीचा उपवास हिंदू धर्मात खूप खास मानला जातो. हे व्रत भगवान गणेशाला समर्पित आहे. या दिवशी, भगवान गणेशाची पूजा केली जाते आणि योग्य विधींसह उपवास केला जातो. या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. हिंदू धर्मात कोणतंही शुभ काम करण्याआधी गणेशाची पूजा केली जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधीवत पूजा केली जाते. गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं.
तर चला तर मग, संकष्टी चतुर्थीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Sankashti Chaturthi Quotes In Marathi 2025 –
ओम गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धीविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!
रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा…
पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप
ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा..
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी..
मोरेश्वरा बा तू घाल पोटी..
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा…
गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी – गणपती बाप्पा मोरया..! – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा…!
हार फुलांचा घेऊन वाहू चला हो गणपतीला
आद्य दैवत साऱ्या जगाचे पूजन करूया गणरायाचे – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!
बाप्पाचे रूप आहे निराळे
येता कोणतेही संकट येतो धाऊनी कायम
त्याने सांभाळले म्हणूनच तर सर्व काही अजूनही नीट आहे
सर्वांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा..!
सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम
अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!