Bakri Eid Wishes In Marathi 2026 – इस्लामिक कॅलेंडरनुसार आज ईद उल अजहा साजरी केली जाते. बकरी ईद म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. देशात आणि जगभरात मुस्लिम बांधव या दिवशी नमाज पठण करतात. पैगंबर इब्राहीम यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आजच्या दिवशी बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते. त्याग आणि समर्पणाचा दिवस म्हणूनही या दिवसाकडे पाहिले जाते.
तर चला तर मग, बकरी ईदनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास बकरी ईदच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Bakri Eid Quotes In Marathi 2026 –
दिवे तेवत आणि तेवत राहू दे, आम्ही तुझी अशीच आठवण ठेवू दे,
आयुष्य आहे तोपर्यंत हीच आमची प्रार्थना, ईदच्या चांदण्यासारखी चमकत राहो..
बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा…!
“ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य लाभो
ईद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा…
बकरी ईद मुबारक”
“माझी ईच्छा आहे की तुमचे आयुष्य
बिर्याणी इतके मसालेदार आणि खिरसारखे गोड असेल..
बकरी ईद च्या शुभेच्छा…”
त्याग, समर्पण आणि कर्तव्यभावनेची शिकवणूक देणारा दिवस म्हणजेच ईद-उल-अज़हा (बकरी ईद).
या पवित्र सणाच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा…
आनंदी समुद्र, त्याचे किनारे, आनंदी चंद्र, आनंदी तारे,
आनंदी फुले, आनंदी सुगंध, आनंदी हृदय,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला बकरी ईदच्या शुभेच्छा…!