भीमा तुझ्या जन्मामुळे Bhima Tuzya Janmamule Lyrics

भीमा तुझ्या जन्मामुळे Bhima Tuzya Janmamule Song Lyrics Bhima Tuzya Janmamule song is sung by Shravan Yashwante.

bhima tuzya janmamule

Enjoy The Superhit Song ‘Bhima Tuzya Janmamule‘ Video Song and Lyrics

Song : Bhima Tuzya Janmamule
Singers : Shravan Yashwante
Musics : Utkarsh-Adarsh
Lyrics : Vamandada Kardak
Director : –
Music Label : –
Release Date : –

Bhima Tuzya Janmamule Song Lyrics

उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे..

एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती
तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती.
अंधार दूर तो पळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…

जखडबंद पायातील साखळदंड
तडातड तुटले तू ठोकताच दंड..
झाले गुलाम मोकळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…

कुजे वृक्ष तैसाच होता समाज
हिरवी हिरवी पाने अन तयालाच आज..
अमृताची आली फळे, भीमा तुझ्या जन्मामुळे..

काल कवडीमोल जीणे वामनचे होते
आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते..
बुद्धाकडे जग हे वळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…

— लोकशाहीर वामनदादा कर्डक

Leave a Comment